मुंबई – ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आतापर्यंत दोन वेळा एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. तर आता अर्जुन रामपाल याची बहीण कोमल रामपाल हिला देखील दुसऱ्यांदा समन्स बजवण्यात आला आहे.
यापूर्वी 6 जानेवारीला सुद्धा कोमल रामपाल हिला अमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजवण्यात आला होता. पण, त्या कारण न देताच गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे काल (दि. १०) पुन्हा एकदा समन्स बजवण्यात आला .
दरम्यान, दोन वेळा समन्स बाजवल्यानंतर अखेर आज कोमल रामपाल एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अर्जुन रामपालच्या घरात सापडलेल्या प्रतिबंधित औषधांप्रकरणात तिची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी अर्जुन रामपालची सुद्धा दोन वेळा एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या आत्महत्यानंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आहे. यानंतर एनसीबीकडून आतापर्यत बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांची चौकशी करण्यात आली.