मुंबई – “व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने बॉलीवूडमधील सर्व सेलिब्रिटीजनी आपापल्या लव्ह पार्टनरला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी स्पेशल गीफ्ट देखील दिली आहेत. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर देखील केले गेले आहेत. पण अनन्या पांडेने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडची आठवण काढली आहे.
View this post on Instagram
तिने एक डेटिंग ऍप बनवले आहे. हे ऍप लॉंच करतानाच तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण काढली. तिने त्याचे नाव सांगितले नाही. तिने त्याचा कोणताही संदर्भही ओपन केला नाही. त्यांच्यातील ब्रेक अप नक्की कोणत्या कारणामुळे झाला, हे देखील अनन्याने सांगितले नाही. मात्र आता पूर्वीचे रोमॅंटिक दिवस आपल्याला आठवत असल्याचे तिने आवर्जुन सांगितले.
View this post on Instagram
पूर्वीचा बॉयफ्रेंड आता आपला केवळ चांगला मित्र असल्याचेही तिने सांगितले. आपल्या एक्स बॉय फ्रेंडच्या आठवणी एका बॉक्समध्ये बंद केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या जुन्या सिनेमांची तिकीटेही जमा केली आहेत. ब्रेक अप झाल्यावर स्वतःला एकटे समजणाऱ्यांना तिने एक समजुतीचा सल्ला दिला आहे. ब्रेक अप झाल्यामुळे काहीही बिघडत नाही. उलट नव्याने सुरुवात करण्याची ही एक चांगली संधी असते, असे अनन्या म्हणाली.
View this post on Instagram