अखेर संध्याकाळच्या सरावाला परवानगी

मुंबई -राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना महाराष्ट्र राज्य सरकारने आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंच्या संध्याकाळच्या सत्रातील सरावाला परवानगी दिली आहे. सुरुवातीला ही परवानगी नाकरण्यात आली होती.

राज्यातील करोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्यांवर संकट तर आलेच होते त्यातच संध्याकाळच्या सरावाला परवानगी नाकारल्यामुळे प्रकाशझोतात होत असलेल्या सामन्यांसाठी सराव कसा करायचा हा प्रश्‍न खेळाडूंसमोर निर्माण झाला होता. पण राज्य सरकारने आता आयपीएलला दिलासा देणारा निर्णय घेत संध्याकाळच्या सत्रात सराव करायला परवानगी दिली आहे.

आयपीएलच्या संघांना दिवसातील दोन सत्रात सराव करता येणार आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 व संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत खेळाडू सराव करू शकतील. यासाठी केळाडूंसह सपोर्ट स्टाफ तसेच वैद्यकीय पथकातील कर्मचारी वर्गाला हॉटेल ते मैदान असा प्रवास करण्याचीही पारवानगी दिली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.