अखेर मतदारसंघातच होणार ‘राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना

आ.रोहित पवारांचा पाठपुरावा;कर्जत जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

जामखेड(प्रतिनिधी) : कर्जत-जामखेड मतदारसंघात राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेची मंजुरी राज्याच्या ग्रह विभागाने यापुर्वी दिली होती.  मात्र तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना त्यांच्या कार्यकालात या पोलिस प्रशिक्षण केंद्राची मंजुरी थांबवता आली नाही. त्यामुळे हे केंद्र मतदारसंघात न होता दुसऱ्याच विभागात मंजुर झाले. मात्र माजी मंत्र्यांच्या हातातून निसटून गेलेल्या या मोठ्या संधीचे मात्र राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांनी आपल्या कुशलतेने सोने केले आहे.

आपल्या हक्काचे असलेले पण काही चुकांमुळे दुसऱ्या विभागात मंजुर झालेले हे प्रशिक्षण केंद्र मतदारसंघातील कुसडगाव (ता.जामखेड) येथे मंजुर करून आणले.  आ. रोहित पवारांची ही ‘पॉवर’ कर्जत जामखेडच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील गट क्र. ४१२ व ४१३ या शासकीय जागेत हे पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार आहे. राज्याच्या ग्रह विभागाने याबाबत शासन निर्णय केला असून तसा आदेशही काढला आहे.त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या वैभवात ही मोठी भर पडली आहे. हे पोलिस प्रशिक्षण केंद्र मतदारसंघात व्हावे यासाठी आ.पवारांचे प्रयत्न सुरू होते. अहमदनगर जिल्ह्यातील हे पहिले राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र ठरणार असून या पोलिस प्रशिक्षण केंद्राचा फायदा बीड, सोलापूर, उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांना होणार आहे.असे असले तरी आता कर्जत जामखेड मतदारसंघाचे स्थान आणखी उंचीवर गेले आहे.

अन् ..हातून निसटून गेलेल्या संधीचेही केले सोने!

राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र हे यापुर्वी मतदारसंघात मंजुर झालेले असतानाही ते थांबवता आले नाही.मात्र आपल्या हक्काचे असलेले हे प्रशिक्षण केंद्र पाठपुरावा करून पुन्हा आपल्याच मतदारसंघात मंजुर करून आणल्याने हातून निसटून गेलेल्या संधीचेही आमदार रोहित पवारांनी सोने करून दाखवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.