तांत्रिक अडचणी दूर करीत ऑनलाइन परीक्षा

अंतिम वर्ष ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा शनिवारी सुरळीत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी आता दूर होण्याच्या मार्गावर आहेत. काही किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा शनिवारी योग्य पद्धतीने होत असल्याचे दिसून आले.

सकाळच्या सत्रात बीए-एलएलबी सिव्हिल प्रोसिजरचा पेपर विद्यार्थ्यांना लॉगइन केले आहे, पण पेपर दिसत नसल्याच्या तक्रारी होत्या. काही विद्यार्थ्यांनी पेपर दिला, पण ते नेटवर्कअभावी सबमीट होऊ शकले नाहीत.

काही प्रश्‍नपत्रिकेत पर्याय स्पष्टपणे दिसून येत नव्हते. चारऐवजी दोनच पर्याय, लॉगइन वेळेत होत नव्हती, अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या होत्या.

एमए मराठीच्या “प्रसारमाध्यमे व मराठी साहित्य’ या विषयाच्या परीक्षेत 40 ते 42 बहुपर्यायी प्रश्‍नातील दोन पर्याय दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली होती. ही बाब विद्यापीठाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून कळविली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.