अंतिम वर्ष परीक्षेचा पेपर 40 टक्‍के सोपा

ऑफलाइन परीक्षा "ओएमआर' पद्धतीने होणार

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत मार्गदर्शक तत्वे व सूचना प्रसिद्ध केली आहे. परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍नाद्वारे (एमसीक्‍यू) होणार असून, यात 40 टक्‍के सोपे, 40 टक्‍के मध्यम व 20 टक्‍के कठीण या काठिण्यपातळीचे प्रश्‍न असणार आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा “ओएमआर’ पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

विद्यापीठाने अंतिम वर्षातील सर्व अभ्यासक्रमांच्यात्यानुसार ह्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने होतील. एकूण 50 गुणांची परीक्षा असून, त्यासाठी एक तासाचा कालावधी राहील. त्यासाठी 60 प्रश्‍नांपैकी 50 अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.

या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

परीक्षेचे नियोजन
1. बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा : 1 ते 9 ऑक्‍टोबर
2. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा : 10 ते 30 ऑक्‍टोबर
3. प्रात्यक्षिक परीक्षा : 15 ते 25 सप्टेंबर

Leave A Reply

Your email address will not be published.