पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत झालेल्या अंतिम वर्ष परीक्षांच्या निकालाच्या प्रक्रियेस गती मिळत आहे. आतापर्यंत 21 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून, जवळपास परीक्षांच्या निकालात 30 टक्क्यांनी वाढ झाली. येत्या आडवठाभरात सर्व निकाल जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
करोना पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 12 ते 31 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा घेतली. यादरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
मात्र, त्यावर मार्ग काढत विद्यापीठाने परीक्षा घेतल्या. विद्यापीठाने नियोजनानुसार निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
सद्य:स्थितीत 21 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. यंदा निकालात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही अभ्यासक्रमांचे निकाल 100 टक्के लागले. आता उर्वरित सर्व निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.