नदीपात्रातील बांधकाम सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी यी तिन्ही नदीकाठच्या अनधिकृत बांधकामे व पत्राशेडचे सर्वेक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच अनधिकृत बांधकामधारक व पत्राशेडमालकांना नोटीस देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील पर्यावरणप्रेमींना राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत तक्रार केली होती. लवादाने दोन्ही महापालिकांना नदी पात्रातील राडारोडा व अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या कामासाठी संयुक्त कृती आराखडा सादर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार महापालिकेने कृती आराखडा तयार करून लवादाकडे सादर
केला आहे.

शहरातून पवना नदी 37 किलोमीटर, इंद्रायणी नदी 20 आणि मुळा नदी 8 किलोमीटर अंतर वाहते. या एकूण 65 किलोमीटर अंतराच्या नदी पात्राचे सर्वेक्षण करण्यास महापालिकेने डिसेंबर 2019 मध्ये सुरूवात केली. पाटबंधारे विभागाने ठरवून दिलेल्या नदीपात्राच्या सीमेनुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नदी पात्रात असलेल्या पत्राशेड, भंगार दुकाने, गॅरेज व बांधकामांना महापालिकेच्या वतीने नोटीस दिल्या जाणार आहेत. बांधकाम व पत्राशेड स्वतःहून काढून घेण्याबाबत त्यांना सांगण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी बांधकामे व पत्राशेड काढून न घेतल्यास महापालिका कारवाई करणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.