नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात, कॉपीराईटमुळे मिळाली नोटीस

मुंबई – मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका केली आहे. चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. मात्र, प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कॉपीराईटच उल्लंघन केल्याबद्दल ‘झुंड’चे निर्माते आणि अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

हैद्राबादमधील नंदी कुमार नावाच्या फिल्ममेकरने नागराज मंजुळे आणि कृष्ण कुमार, टी सीरीजचे प्रबंध अधिकारी भूषण कुमार, अमिताभ बच्चन आणि ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे असे विजय बरसे यांना ही नोटीस पाठवली आहे. मात्र, या नोटीसला फक्त टी-सीरीजने उत्तर दिले असून त्यातून काहीही भूमिका स्पष्ट होत नसल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

आपल्या नोटीसमध्ये कुमार यांनी म्हटलं आहे, की ‘चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाचा आधार घ्यावा लागला. चित्रपटाचं स्क्रिनिंग थांबवण्यात यावं, असही त्यांनी म्हटले आहे. मात्र, नागराज मंजुळे, अमिताभ बच्चन आणि ‘झुंड’च्या निर्मात्यांनी या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केले आहे, असे कुमार यांचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)