मुंबई – बॉलीवूडचा चुलबूल पांडे अर्थातच सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट दबंग 3 डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातून हे दोघे एकत्र येणार आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. सलमान खानने या चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.
And the journey begins . . .#RadheEid2020 @SohailKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @atulreellife @nikhilnamit @SKFilmsOfficial @reellifeprodn pic.twitter.com/rup4OZFr2I
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 1, 2019
दरम्यान, ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट पुढील वर्षी 2020 च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे. सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री दिशा पटानी, अभिनेता रणदीप हुड्डा, जॉकी श्रॉफ, अभिनेता सोहेल खान, दिग्दर्शिक प्रभूदेवा, आणि सलमान खान दिसत आहेत.
Filming begins… Salman Khan and director Prabhu Dheva reunite for the third time, after #Wanted and #Dabangg3… Titled #Radhe: Your Most Wanted Bhai… Stars Salman Khan. #RadheEid2020 pic.twitter.com/zYQW5rApuw
— taran adarsh (@taran_adarsh) November 1, 2019