मुंबई – मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतंच (गुरुवारी) 68 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्ट, अनिल कपूर, रेखा, जान्हवी कपूर, नोरा फतेही, विकी कौशल आणि इतर कलाकारांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्सचा कार्यक्रम सलमान खानने होस्ट केला. तर आयुष्मान खुराना-मनीष पॉल यांनी देखील त्याची साथ दिली.
यावेळी, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार “राजकुमार राव’ला मिळाला, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला. याशिवाय संजय लीला भन्साळी यांना ‘गंगुबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावावर कोरून घेऊन अभिनेता राजकुमार राव याने एक वेगळा दर्जा निर्माण केला आहे.
बी टाऊन मधला शेप लिस्टर अभिनेता म्हणून राजकुमार ची चर्चा सर्वत्र आहे आणि अश्यातच बधाई दो या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी बेस्ट अभिनेता म्हणून ब्लॅक लेडी त्याने पटकावली आहे. फिल्मफेअर 2023 मध्ये राजकुमार याला बेस्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम काम करण्यात राजकुमार बेस्ट आहे.
अनेक दर्जेदार कथा वर सध्या तो काम करताना दिसतोय. सह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनुभव सिन्हा यांच्या सोबत केलेला भीड सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि 2023 मध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. राजकुमारने नुकतंच स्त्री 2 ची रिलीजची तारीख घोषित केली.
2023 मध्ये राजकुमार अनेक नव्या विषयावर चित्रपट करणार असून “मिस्टर आणि मिसेस ,गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक करणार आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राजकुमार राव याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत.