मुंबई – चित्रपट निर्माता रमेश तौरानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत याची माहिती दिली. ज्यामध्ये सांगितले की, ते वॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर कोविड पॉझिटीव्ह आले आहेत. रमेश तौरानी यांनी इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहले, ”मी टेस्टमध्ये कोविड पॉझिटीव्ह आढळलो आहे आणि बीएमसीला सूचित केले आहे.
मी सर्व सावधानतेचे पालन करत आहे आणि ठीक होण्यासाठी औषधे घेत आहे. जर तुम्ही मागील दोन आठवड्यात माझ्या संपर्कात आला असाल, तर कृपया टेस्ट करुन घ्या. मी वॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. यातून लवकरच ठीक होण्याची आशा आहे. कृपया मास्क वापरा आणि सुरक्षित रहा.”
यापुर्वीसुद्धा बऱ्याच बॉलीवूडमधील मंडळीना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर बुधवारी बॉलीवूडचा अभिनेता अमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तो घरीच क्वारंटाइन आहे. तत्पुर्वी सोमवारी अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने स्वता: ट्विट करुन दिली होती. आताच काही दिवसापुर्वी केलेल्या टेस्टमध्ये अभिनेता रणबीर कपूर, चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली, अभिनेता मनोज वाजपेयी, सिद्धांत चतुवेर्दी, तारा सुतारिया आणि अभिनेता-चित्रपट निर्माता सतीश कौशिक या बॉलीवूडमधील मंडळींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.