Actress Kavya Gowda : सिनेसृष्टी हादरवून ठेवणारी बातमी समोर आली असून, लोकप्रिय कन्नड अभिनेत्री काव्या गौडा (Kavya Gowda) यांच्या कौटुंबिक वादाचं रूपांतर गंभीर हिंसक घटनेत झालं आहे. अभिनेत्रीचा पती सोमशेखर याच्यावर नातेवाईकांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांमध्ये झालेल्या वादानंतर शाब्दिक चकमक हल्ल्यात बदलली. या घटनेत सोमशेखर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याची प्रकृती स्थिर असून जखमा जीवघेण्या नाहीत. मोठ्या कुटुंबात एकत्र राहत असताना निर्माण झालेले मतभेद आणि मुलीशी संबंधित मुद्द्यांमुळे हा वाद वाढल्याची माहिती आहे. या भांडणात सोमशेखरचा भाऊ आणि इतर नातेवाईक सहभागी होते. पोलिसांत गुन्हा दाखल : या प्रकरणी काव्या गौडाची बहीण भव्या गौडा हिने राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांचे जबाब तपासत आहेत. हे देखील वाचा… Varun Dhawan : वरुण धवन पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल काव्या गौडाची प्रतिक्रिया : माध्यमांशी बोलताना काव्या गौडाने हा प्रकार गैरसमज आणि खोट्या आरोपांमुळे घडल्याचं सांगितलं असून, सीसीटीव्ही पुराव्यांमधून सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तिने कायदा आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचंही नमूद केलं आहे. Kavya Gowda दरम्यान, काव्या गौडा (Kavya Gowda) ही कन्नड टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं ‘राधा रमणा’ आणि ‘गांधारी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, आता ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही बातमी नक्की वाचा… Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रीमंडळ बैठकीतले ५ मोठे निर्णय; कंत्राटदारांना मोठा दिलासा, जाणून घ्या Accident News : ओतूर जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन ठार