पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ वेस्टर्न रीजनच्या पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आशय फिल्म क्लबचे सचिव, तसेच अनेक महोत्सवांचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या वेळी २०२४-२६ कालावधीसाठी कार्यकारिणीचे १२ सदस्य आणि पाच स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली.
चित्राव हे गेली ४० वर्षांहून अधिक काळ चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कलाक्षेत्रात कार्यरत असून, आशय फिल्म आणि सांस्कृतिक क्लबचे सचिव आहेत. पुलोत्सव, आशियाई चित्रपट महोत्सव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंम्बा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव,
शि. द. १०० महोत्सव इत्यादी अनेक महोत्सवांचे ते संयोजक असून, आजपर्यंत देशभरात सुमारे ४०० महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले आहे.
फिल्म सेन्सॉर बोर्ड, महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली आहे. विविध विषयांवर आपले विचार त्यांनी लेखन आणि भाषणांमधून सातत्याने व्यक्त केले आहेत.
कार्यकारिणी सदस्य
अध्यक्ष – किरण व्ही. शांताराम
उपाध्यक्ष – वीरेंद्र चित्राव
रिजनल सेक्रेटरी – संदीप मांजरेकर
सचिव – दिलीप बापट
खजिनदार – डॉ. सुनील पुणतांबेकर
सदस्य – राजभूषण सहस्रबुद्धे, नंदिनी देसाई, जितेंद्र पाटील, ऋता धर्माधिकारी, अमोल चाफळकर, हेमंत बेळे, अशोक सावंत
स्वीकृत सदस्य – डॉ. संतोष पाठारे, सतीश जकातदार, अमित चव्हाण, राजेंद्र तालक, डॉ. नवनीत तोष्णीवाल.