पुणे: संगम पूल येथील नाईक बेटाजवळ टाकण्यात आलेला राडारोडा आणि भराव महापालिकेने काढाण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे, तर त्याठिकाणी उभारलेले अनधिकृत शेडही महापालिकेने काढले आहेत.
संगमपूलाजवळ मुळा-मुठा नदीचे पात्र भराव टाकून बुजवून “नाईक बेट’ नावाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रस्ता बनवण्यात येत होता. तसेच याठिकाणी खासगी प्रवासी बसही पार्क केल्या जातात. या खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी येथे शेड उभारून आपली ऑफिसेसही थाटली आहेत. येथील 28 शेडवर महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने कारवाई केली.