राज्यमंत्री भरणे यांची उमेदवारी दाखल

इंदापूर  -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (बुधवारी) ब वर्गातून उमेदवारी अर्ज भरला.

जिल्हा बॅंकेवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे 25 वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. इंदापूर तालुक्‍यातील विविध

कार्यकारी सेवा संस्थेचे व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ब वर्गासाठी पणन व कृषी संबंधित सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतात.

जिल्ह्यामध्ये सुमारे 90 मतदार आहेत. जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात,

प्रवीण तुपे, जयदीप काळभोर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रशांत पाटील उपस्थित होते. प्रवीण तुपे हे सूचक व जयदीप काळभोर अनुमोदक आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रवीण तुपे यांनी राज्यमंत्री भरणे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढवली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.