बदनामीकारक लिखाणप्रकरणी गुन्हा दाखल

आ. बाळासाहेब पाटील यांची फिर्याद; ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव

कराड – कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल अक्षेपार्ह लिखान करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एका साप्ताहिकाच्या संपादकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.

दरम्यान, या बदनामी कारक घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत आमदार बाळासाहेब ऊर्फ शामराव पांडुरंग पाटील (वय 57 वर्षे) यांनी म्हटले आहे की, मी गेली अनेक वर्षापासून सार्वजनिक जिवनात सक्रीय असून सन 1999 पासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. माझी समाजात सभ्य व चारित्र्य संपन्न नेता म्हणून ओळख आहे.

दरम्यान, घोणशी येथील माणिकराव पाटील हे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक आहेत. 20 मे रोजी माणिक पाटील आ. पाटील यांचेकडे गेले. एका साप्ताहिकाच्या व्हॉटस ऍप ग्रुपचे ऍडमिनने संबंधित ग्रुपवर आ. बाळासाहेब पाटील यांच्या बाबत बदनामीकारक मजकूर असलेली बातमी प्रसिध्द केली आहे. या बदनामीकारक मजकुरामुळे आमदार पाटील समर्थक व त्यांच्या नातेवाईकांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे आ. पाटील यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती. याप्रकरणी पोलीसात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नाहक बदनामी करण्याचे संबंधितांचे षडयंत्र आहे. आम्ही यशवंत विचारांचे पाईक असल्याने आमच्याकडे संयम आहे. मात्र कोणी तरी आमच्यावर नाहक शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमची बदनामी करणारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. यादृष्टीने पोलीस यंत्रणेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता याची चौकशी करुन या प्रकरणातील सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.

आमदार बाळासाहेब पाटील, कराड उत्तर विधानसभा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here