दौंड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असतानाच आज (दि.७) ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजलेपासून दौंड तालुक्यातील आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर कारखान्यावरही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौंड शुगर कारखान्याचे मार्गदर्शक आहेत.
सदर पथकाची कारखान्याच्या मुख्य ऑफिस मद्धे चौकशी सुरू असून ऑफिस च्या गेटवर पोलीस व सी आर पी एफ जवानांचा खडा पहारा असून आत व बाहेर एकाही व्यक्तीला जाण्यायेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
आयकर विभाग नेमक्या कोणत्या कारणास्तव शोध मोहिम राबवित आहे याचा तपशील उपलब्ध झाला नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित दौंड सहकारी साखर कारखान्याचे सन २००९ मध्ये दौंड शुगर लिमिटेड मध्ये रूपांतर झाले होते. देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.