पुणे – गाळा स्वत:च्या नावाने नसताना डिपॉझिट व पिग्मीसाठी 5 लाखांची रक्कम घेऊन एकाची फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात सिताराम गोविंद भिकुले (रा. वेल्हे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी बाबु यल्लाप्पा सदावर (21, रा. चंदगड, कोल्हापूर) याने पर्वती येथील एक गाळा आरोपीच्या मदतीने पाहिला होता. तो आरोपीने स्वत:च्या ताब्यात असल्याने बाबु यांना सांगितले. मात्र, त्याचे मूळमालक शहा हे आहेत.
भाडेकरार करताना सिताराम याने तीन वर्षांच्या करारापोटी तीन लाख व पिग्मीसाठी महिना 32 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. याप्रमाणे पाच लाख रुपये बाबु यांच्याकडून सिताराम याने घेतले. मात्र, दर महिन्याचे 28 हजार भाडे दुकानमालक शहा बाबुकडून घेऊन जात होता. बाबुने पाच लाख रुपये सितारामने घेतल्याचे शहा यांना सांगितल्यावर त्यांनी “तुमचे तुम्ही बघुन घ्या’ म्हटले होते.
यामुळे बाबुने सितारामला फोन करून दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, सितारामने पैसे परत न दिल्याने फसवणुकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.