बॉलिवूडमधील अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

मुंबई – सुशांतसिंह राजपूतने नैराश्‍यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्‍का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले.
यातच  बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात खटलाच दाखल केला आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत हा मुळचा बिहारचा होता. त्याच्यावर अन्याय करण्यात आला. सुशांतकडून सात सिनेमे काढून घेण्यात आले. तसेच त्याच्या काही फिल्मस प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. याविरोधात मी तक्रार दाखल केली असून अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केल्याने सुशांतने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचा आरोप वकील सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले,’दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.’ असं ही त्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.