झाकिर नाईक विरोधात मनी लॉंडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईतील विशेष कोर्टाने फरार इस्लामिक प्रचारक झाकिर नाईक विरोधात गुन्हा दाखल केला. नाईक आणि इतरांच्या विरूद्ध मनी लॉंडरिंगची केस दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने आरोप पत्र स्वीकारले असून खटल्याची सुनावणी करण्यासाठी १९ जून तारीख निश्चित केली आहे.

नाईकच्या विरोधात तीन वर्षांपूर्वी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापाठोपाठ जून 2017 मध्ये न्यायालयाने त्याला फरार म्हणून घोषित केले. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईकच्या मुंबईतील दोन सदनिका आणि एका व्यावसायिक इमारतीवर टाच आणली. आता नाईकच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.