आमदार रमेश कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बीड: करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सोशल डिस्टंन्सिग आणि संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आमदार रमेश कराड यांनी चक्क सोशल डिस्टंन्सिगला हरताळ फासला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराड हे मास्क, ग्लोव्हज न घालता समर्थकांच्या गराड्यात गोपीनाथ गडावर आले होते. तेथे त्यांनी स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र यावेळी संचारबंदी असतानाही त्यांचे शेकडो कार्यकर्ते जमले होते व त्यांनी देखील कराडांसोबतच समाधीचे दर्शन घेतल्याने सोशल डिस्टंन्सिगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.

एकीकडे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोशल डिस्टंन्सिग पाळा, मास्क वापरा असे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र, भाजपच्या लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे समोर आले आहे. कराड यांच्याकडून करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोणतीही काळजी यावेळी घेण्यात आलेली दिसली नाही. आमदार कराड यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.