म्हणून आमदार प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर – करोना काळात बेकायदेशीरपणे विनापरवाना जमाव जमविला आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बझार पोलिसांत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरात कॉंग्रेसच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पोषाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकांचे फोटो अडकविले होते. इंधन दरवाढ, गॅसचे वाढलेले दर आणि महागाईच्या विरोधात केलेलेया या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदेसह विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक देशमुख हे करीत आहेत.

करोना महामारीच्या काळात सुद्धा जनहित धोक्‍यात घालून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य यावेळी आंदोलकांकडून झाले. जाणीवपूर्वक कृत्य करून पोलिसांच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष केले. तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणारच, अशी भूमिका आंदोलकांनी त्यावेळी घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.