मंचर -करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करूनही या क्षेत्रामध्ये खते, औषधाचे दुकान चालू ठेवल्याप्रकरणी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील दुकानमालकावर सोमवारी (दि. 13) सायंकाळी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांडेवाडी येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने तेथे शासनाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. शंकर मार्तंड शेवाळे (वय 47) यांनी त्यांचे भैरवनाथ एजन्सी खते औषधाचे दुकान चालू ठेवले. सरकारच्या आदेशाचा अवमान करून करोना रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पोलीस जवान राजेंद्र हिले यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फिर्याद दिली आहे.