Pune Crime | मयत सराईत गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल

पुणे, दि.17- बिबवेवाडी येथे खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार माधव वाघाटे व त्याच्या साथीदारांविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सावन गवळी (23,रा.बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनूसार ते शनिवारी रात्री मित्र सुनिल घाटे याच्याबरोबर रस्त्यावर बोलत उभे होते. यावेळी त्यांनी त्यांचा मित्र आनंद निवृत्ती कामठे याच्या वाढदिवसानिमीत्त व्हॉटसअपवर शुभेच्छा देणारा स्टेटस ठेवला होता. याचा राग मनात येऊन मयत माधव वाघाटे हा तेथे दाखल झाला. त्याने ” बघ आज तुझे तुकडे करायला माझी गॅंग आणली आहे.’ असे म्हणत हातातील लोखंडी कोयता सावन गवळीच्या डोक्‍यावर मारला. मात्र त्याने मार चुकविला.

यानंतर त्याला बांबु व दगडांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये सावन गवळी गंभीर जखमी झाला. दरम्यान यावेळी झालेल्या भांडणात माधव वाघाटे याच्यावर पेवर ब्लॉक व बांबूने हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील काही संशयीत आरोपींना अटकही करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.