राशीन येथील करोनाबाधित रुग्णावर गुन्हा दाखल 

विनापरवाना केला राशीन-पुणे प्रवास; माहितीही लपवली 

कर्जत -मागील आठवड्यात करोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील 53 वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या काळात अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय इतर जिल्ह्यांत न जाण्याचे आदेश होते. मात्र या व्यक्तीने विनापरवाना, बेकायदेशीररित्या लपून-छपून प्रवास केला. 16 मे रोजी राशीनहून पुणे, तर 19 मे रोजी पुणे येथून राशीनला प्रवास केला.

त्यानंतर ही व्यक्ती राशीन येथील करोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. ंत्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या 53 वर्षीय व्यक्तीच्या संपर्कामुळे कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.