स्टॅन्ड अप कॉमेडियन सुनील पालने काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता. करोनाच्या साथीदरम्यान डॉक्टर, नर्स आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. मात्र 90 टक्के डॉक्टर हे राक्षसी वेशात आहेत, तर केवळ दहा टक्के प्रत्यक्ष काम करत आहेत, असे वादग्रस्त विधान सुनील पालने या व्हिडिओमध्ये केले होते.
त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पालने एफआयआरमधील दावा फेटाळला आहे. मला त्याच्यामध्ये दहा टक्के डॉक्टर प्रामाणिक आहेत, असे म्हणायचे होते आणि आपण तसेच म्हटले आहे.
तर प्रामाणिक डॉक्टरांना राग येण्याचे कारण नाही, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या व्हिडिओवर खूप टीकात्मक प्रतिक्रिया ही पोस्ट होत आहेत. सुनील पालच्या या व्हिडिओवर बॉलीवूडमधूनही खूप टीका व्हायला लागली आहे.