शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा?- रुपाली चाकणकर

बल्लारपूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेतून भाजपवर हल्लाबोल करत आहे. बल्लारपूर येथील सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सरकारवर ताशेरे ओढल.

चाकणकर म्हणाल्या, १६ हजार शेतकऱ्यांचा जीव या सरकारने घेतला आहे. आता यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का? या गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला हाणून पाडण्याची वेळ आपण आणायची आहे. ग्रामपंचायतीत निवडून न येणारी माणसे आज मंत्री झाले आहेत. ज्या झाडाने आपल्याला सावली दिली त्याच झाडाच्या मुळावर उठाणाऱ्या लोकांना जनता कधीच माफ करणार नसल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.