भुवनेश्वर : भारतीय हाॅकी संघाने एफआयएच प्रो-लीग हाॅकी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या नेदरलँड्स संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव करत विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताचा हा सलग दुसरा विजय असून पहिल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सला ५-२ असे नमवले होते.
FT: 🇮🇳 3-3 (3-1) 🇳🇱
We did it!💪🔥
Thank you to everyone who came out and supported!💙 pic.twitter.com/CeE17lVnqY
— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2020
सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघामध्ये ३-३ अशी गोल बरोबरी झाली होती. निर्धारीत वेळेत भारताकडून ललित उपाध्याय (२५ मि.), मनदीप सिंग (५१ मि.) आणि रूपिंदरपाल सिंग (५५ मि.) यांनी गोल केले होते. तर नेदरलँड्सकडून वीरडेन वान डेर मिंक (२४ मि.), जेरोन हर्टसबर्ग (२६ मि) आणि केलेरमैन ब्योर्न (२७ मि) यांनी गोल केले.
पेनल्टी शूटआउटमध्ये विवेकसागर प्रसाद, आकाशदीप सिंग आणि गुजरंत सिंग यांनी गोल नोंदवत विजय साकरला. नेदरलँडसकडून मिरको प्रूज्सेरने एकमेव गोल नोंदविला. भारतीय संघ दोन सामन्यातील ५ गुणांसह अव्वलस्थानी तर निर्धारित वेळेत स्कोर बरोबरीत राहिल्याने नेदरलँड्सला १ गुण मिळाला.