पोचेफस्ट्रोम – ज्युनिअर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला ब्रॉंझपदकाच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. भारताची स्टार खेळाडू मुमताज खानने दोन गोल केल्यानंतरही भारताला निर्धारित वेळेत 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना गमवावा लागला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने 3-0 अशी लढत जिंकत ब्रॉंझपदक पटकावले. भारताच्या महिला संघाने 2013 सालच्या स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते. त्यानंतर संघाला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.