पुणे,दि.8- पॅसेंजर मिळत नसल्याने तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकावर ब्लेडने सपासप वार केले. ही घटना गुंजन चौकात भोला पान शॉपसमोरील रिक्षा स्टॅंडवर घडली. याप्रकरणी तोफीक जहॉंगीर बाकी(30,रा.येरवडा) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी संभाजी मदने (30,रा.हडपसर) व आरोपी तोफीक हे दोघेही रिक्षा चालक आहेत. त्यांच्यामध्ये याअगोदर पॅसेंजरवरुन भांडणे झाली होती. यातच गुरुवारी सायंकाळीही पॅसेंजर मिळत नसल्याने त्यांच्यात वाद झाला.
यात तोसीफने शिवीगाळ करुन तोंडावर बुक्की मारत संभाजीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संभाजीच्या गळ्यावर, गालावर व कानाच्या बाजूला ब्लेडने वार केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करत आहेत.