चौथ्या स्थानासाठी कोलकाता आणि पंजाबमध्ये लढत

मोहाली: आयपीएलचा बारावा मोसम शेवटाकडे झुकलेला असून अद्यापही प्ले ऑफ मधील तिसरा आणि चौथा संघ कोणता याचा निर्णय झालेला नाही. या स्थानासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांदरम्यान आज महत्वपूर्ण सामना होणार आहे.

यंदाच्यामोसमात धडाकेबाज सुरूवात करनाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोसमाच्या मध्यात लागोपाठ सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. मात्र, मुंबई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत कोलकाताच्या संघाने स्पर्धेत पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे.

कोलकाताने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करला असून पाच सामन्यांमध्ये ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे 10 गुण असून त्यांना 14 गुण मिळवण्यासाठी आजच्या सामन्यात पंजाबचा आणि आगामी सामन्यात मुंबईचा पराभव करण्याची गरज असून 14 गुण मिळवले तरी त्यांना आपल्य धावांची सरासरी अव्वल ठेवावी लागणार आहे. तेंव्हाच त्यांचा संघ बाद फेरीत प्रवेश मिळवू शकेल.

तर, दुसरीकडे पंजाबच्या संघाने यंदाच्या मोसमात 12 सामन्यांपैकी पाच सामन्यत विजय मिळवला असून सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून सध्या ते 10 गुणांसह क्रमवारीत सातव्या स्थानी आहेत. आजचा सामना जिंकल्यास त्यांचे 12 गुण होतील आणि ते क्रमवारीत पाचव्या स्थानी पोहोचतील.

प्रतिस्पर्धी संघ –
किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, नितिश राणा, रिंकू सिंह, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.