वरीष्ठ अधिकाऱ्याच्या वरदहस्ताचा धोस

सायबर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी

 

पुणे – लॉकडाऊन काळात सायबर गुन्ह्यांत वाढ झाली. शिवाय, सायबर पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी करोनाग्रस्त झाल्याने मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. अशापरिस्थितीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पुणे सायबर पोलीस ठाण्याच्या आवारात एका पोलीस हवालदाराकडून एक फाईल देणे-घेणे वादातून सहकारी पोलीस शिपाईस बेदम मारहाण करण्यात आली.

संबंधित पोलीस हवालदारास एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा वरदहस्त असल्याने त्याने सर्वांसमक्ष मारहाण केल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांत आहे. पोलीस कर्मचारी यांनी करोना परिस्थितीत एकमेकांना समजून घेत काम करणे अपेक्षित असताना अशाप्रकारे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय आवारात मारहाण करू लागल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे.

हे प्रकरण घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्‍त संभाजी कदम यांनी याबाबत आपणास कोणती माहिती नसून संबंधित विभागाकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई करू, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.