नगर – न्यू आर्टस महाविद्यालयाच्या ग्रंथालयासमोर दोघांना फायटरने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघे जब्बर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 13 ते 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमीत पाटोळे, प्रफुल्ल देठे, सोनू कानडे, शिवम वाडकर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व इतर 9 ते 10 अनोखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव परिसरात राहणारा विद्यार्थी महांडुळे व महेश जाधव हे दोघे जखमी झाले आहेत.
महांडुळे व जाधव हे दोघे न्यू आर्टस महाविद्यालयाच्या ग्रंथालयसमोर उभे होते. त्यावेळी 13 ते 14 जणांचे टोळके त्यांच्याजवळ आले. तू मी आमच्या सोबत का राहत नाही, असे म्हणून त्यांनी महांडुळे यांच्या डोक्यात मारून खाली पाडले. त्यानंतर लोकांनी महेश जाधव व महांडुळे या दोघांना मारहाण केली.