व्हिडिओ : निवडणूक बैठकीत भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

बंगळूरू – कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेली भाजपची बैठक चांगलीच चर्चेत राहली आहे. या बैठकीमध्ये दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारीपर्यंत मजल गेली. बैठकी दरम्यान भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री के गोपालय्या यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकी दरम्यान बीएस येडियुरप्पा यांचे सहकारी एनआर संतोष भाषण करत होते. तेव्हा कार्यकर्त्यांच्या एका गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अरसिकरेमधील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्री गोपालय्या यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन करणारे कार्यकर्ते ते मानायला तयार नव्हते. जसे मंत्री कार्यक्रमस्थळावरून बाहेर जाण्यासाठी निघाले तसा एक गट भांडणासाठी उतरला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये बैठकी दरम्यान कार्यकर्ते एकमेकांना मारताना दिसून येत आहे. तेच दुसरीकडे काही कार्यकर्ते हे भांडण सोडविण्याचा सुद्धा प्रर्यंत्न करताना दिसून येत आहेत.

या मारामारी मध्ये काही जण जखमी सुद्दा झाल्याचे बघायला मिळाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेनंतर मंत्री के गोपालय्या व एनआर संतोष यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मारामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटातील एकाही गटाने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.