लढत होऊनच जाऊ दे – मेरी कोम

नवी दिल्ली: भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू सुपरमॉम मेरि कोमने निखित झरीनचे आव्हान स्विकारले असुन आता ही ल्पर्धा होऊनच जाऊदे असे मेरिने बजावले आहे. संघ निवड चाचणीसाठी ही होणार असेल, तर मी झरीनचा सामना करायला घाबरत नाही. तिचा पराभव करुन थाटात संघात प्रवेश करीन असा विश्‍वासही मेरिने व्यक्त केला.

बिंद्राला केले लक्ष्य
देशाचा अव्वल नेमबाज अभिनव बिंद्राने देखील निखीतच्या मागणीला समर्थन दिले होते, त्यामुळे मेरिने त्याला देखील लक्ष्य केले. बिंद्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, मी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. मी त्याच्या नोमबाजीबद्दल काहीही बोलत नाही मग त्यानेसुद्धा मुष्टियुद्धाबाबत बोलु नये, असे मेरीने सुनावले आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रथमीक फेरीची संघ निवड होणार आहे. 51 किलो वजनी गटात मेरी आणि आपली चाचणी लढत घ्यावी आणि त्यात जिंकणाऱ्या बॉक्‍सरला प्राथमिक फेरीच्या स्पर्धांसाठी पाठवावे, अशी मागणी निखतने केली आहे.

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने निर्णय घेतला आहे. मी तिचा सामना करायला घाबरत नाही. चाचणी घेण्यात येणार असेल तरही ठीक आहे, मी खेळायला तयार आहे, असे मेरीने सांगतिले. रशियात नुक्‍यात झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत मेरीने ब्रॉंझपदक पटकावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.