चंद्र मोहिमेची पन्नाशी पुर्ण

गुगलने तयार केला खास डूडल

नवी दिल्ली : अमेरिकेच्या Apollo मोहिमेला आज 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गुगलने होमपेजवर डूडल तयार केला आहे. गुगलच्या या अनोख्या डूडलवर क्‍लिक करताच एक व्हिडिओ प्ले होतो. या व्हिडिओत अमेरिकेच्या पहिल्या चंद्रावरील मोहिमेची संपूर्ण स्टोरीच सांगण्यात आली आहे. अमेरिकेने 16 जुलै 1969 रोजी अपोलो यान चंद्रावर पाठवले होते.
अपोलो 11 या यानातून प्रथमच दोन अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर परतले होते. या मोहिमेद्वारे मानवाने प्रथमच चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. 16 जुलै 1969 रोजी कॅनडी स्पेस सेंटर येथून सकाळी 8.32 मिनिटांनी अपोलो यान चंद्राकडे झेपावले होते. अपोलो 11मध्ये 3 अंतराळवीर होते. यात मिशन कमांडर नील आर्मस्ट्रॉग, कमांडर मॉड्यूल पायलट मायकल कोलिन्स आणि लूनर मॉड्यूल पायलट एडविन ई.एल्डिन ज्यूनिअर यांचा समावेश होता.

अपोलो यान 20 जुलै 1969 रोजी दुपारी 3.17 मिनिटांनी चंद्रावर यशस्वीपणे उतरले. त्यानंतर नील आर्मस्ट्रॉग यांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले. या मोहिमेत चंद्रावरील मातीचे नमूने गोळा करण्यात आले. अनेक प्रयोग करण्यात आले आणि फोटो देखील घेण्यात आले. निल ऑर्मस्ट्रॉग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रावर काही यंत्रणा देखील तैनात केल्या. हे अंतराळवीर अडीच तास चंद्रावर होते. मानवाच्या या ऐतिहासिक अशा मोहिमेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गुगलने व्हिडिओ डूडल तयार केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)