नगर – नगर तालुक्यातील रूईछत्तीशी येथील एका कुटुंबाच्या शेत जमिनीवर अतिक्रमण केले. जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला व दमदाटी करत मारहाण केल्याची घटना 14 नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 9) नगर तालुका पोलीस ठाण्यात अक्षय रमेश भळगट (रा. प्रोफेसर चौक, नगर) याच्यासह अनोळखी 50 ते 60 जनांनवर ऍट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र अशोक धाडे (वय- 38 रा. रूईछत्तीशी ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 14 नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास धाडे कुटुंबासह रूईछत्तीशी येथील शेता (गट क्र.1) मध्ये गेले होते. त्यावेळी नगर शहरातून अनोळखी 50 ते 60 जन आले व शेतात खड्डे करू लागले. फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली असता. आम्हाला अक्षय भळगट याने पाठविले आहे.
शेताला कंपाउंट करण्यास सांगितले आहे, असे त्या इसमांनी फिर्यादींना सांगितले. शेताजवळ वाटेफळ ते अंबिलवाडी असा रस्ता असून, आमच्या वस्तीकडे येण्या-जाण्यासाठी वापरतो, असे फिर्यादी यांनी त्या इसमांना सांगितले. यावर फिर्यादी यांचे त्यांनी ऐकून न घेता रस्ता बंद करत मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.