पुणे : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. त्यात मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मिरवणूकीस सज्ज झाला आहे. पारंपारिक पद्धतीने श्रींच्या मिरवणूकीस सुरूवात होणार आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मुर्ती विराजमान झाली आहे. दरम्यान, श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांचे ढोलताशा वादन होणार आहे.