पंधरा दिवसांच्या सीबीआय चौकशीत अनेक विषय बाहेर येतील – चंद्रकांत पाटील

पुणे –अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचा राजीनामा माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही झाला नसता, तो शरद पवारांच्या एका आदेशावर झाला. जोपर्यंत राजकारणात आणि समाजकारणात चुकेल त्याची शिक्षा हा पायंडा पडत नाही तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पंधरा दिवसांच्या सीबीआय चौकशीत अनेक विषय बाहेर येतील. वाझे एनआयए चौकशीत जे बोलले आहेत, ते तर अजून बाहेर यायचंच आहे. परंतु सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडेल अशा घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.