वर्ल्ड कप पात्रता लढत : ओमानचा भारतावर विजय

मस्कत – मोहसिन अल गसानीच्या एकमेव गोलाच्या जोरावर ओमानने मस्कत येथील काबूस स्पोर्टस काॅम्पलेक्समध्ये मंगळवारी झालेल्या पात्रता लढतीत भारतीय संघावर १-० अशी मात केली. या पराभवसह भारतीय फुटबाॅल संघाच्या २०२२ कतार फुटबाॅल वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला धक्का बसला आहे.

FULL-TIME! The referee blows the long whistle, and Oman take the 3⃣ points.

?? 1-0 ??#OMAIND#BackTheBlue ? #IndianFootball#BlueTigers ? pic.twitter.com/jOWkXMwAMW

— Indian Football Team (@IndianFootball) November 19, 2019

सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला अल घसानीने गोल नोंदवून ओमानचे खाते उघडले. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही, आणि भारतीय संघाला पराभवास सामोरे जावे लागले.

दरम्यान, यासह ओमान संघ १२ गुणांसह ‘इ’ गटात दुस-या स्थानावर पोहचला आहे. तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर असून, पाच सामन्यांअखेर भारतीय संघाच्या खात्यात केवळ ३ गुण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.