फिफा विश्‍वचषक पात्रता फेरीतील सामने भारतात

संग्रहित छायाचित्र.......

मुंबई – कतारयेथे 2022 मध्ये होणाऱ्या फिफा विश्‍वचषकासाठीच्या दुसऱ्या पात्रता फेरीतील भारत-ओमान यांच्यातील सामना गुवाहटीमध्ये खेळवला जाण्याची शक्‍यता आहे. भारतीय संघाला पात्रता फेरीमध्ये आशियाई संघामध्ये तुलनात्मकदृष्ट्‌या दुबळ्या संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ ग्रुप ई मध्ये कतार, ओमान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश यांच्या गटात आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयएसएल स्पर्धेनंतर भारतातील फुटबॉलमध्ये झालेल्या सुधारणेच्या जोरावर गुवाहटीच्या मैदानात पात्रता फेरीतील काही सामने खेळवणे शक्‍य होईल. ते पुढे म्हणाले की, आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) अधिकारी लवकरच आयोजन स्थळाचे निरीक्षण करुन नियोजित मैदानाबाबत निर्णय घेतला जाईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)