दोहा – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहिर करण्यात आली आहे. फिफाने जाहिर केलेल्या गट रचनेनूसार मेक्सिको व अमेरिका एकाच गटात असल्याने पात्रता स्पर्धेतील रोमहर्षक लढती या फेरीतही पाहायला मिळणार आहेत.
मेक्सिको व अमेरिका यांना 2 क्रमांकाच्या गटात स्थान देण्यात आले आहे. पनामाकडून पराभूत झाल्यामुळे कॅनडाचा संघ चौथ्या गटात आहे. पहिल्या गटात यजमान कतारसह सात बलाढय संघांचा समावेश आहे. चौथा गट वगळता इतर विभागातील संघ जागतिक क्रमवारीनुसार सहभागी होतील.
चौथ्या गटात क्रमवारीनुसार पाच देशांसह उर्वरित तीन पात्रता फेरीचे संघ सहभागी होतील. चार विभागांतील एक संघ प्रत्येक गटात असेल. आठपैकी पाच गटांत जास्तीत जास्त दोन युरोपियन संघ असतील.
गट 1 : कतार (यजमान),ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल.
गट 2 : मेक्सिको, नेदरलॅंड्स, डेन्मार्क, जर्मनी, उरुग्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका, क्रोएशिया.
गट 3 : सेनेगल, इराण, जपान, मोरोक्को,सर्बिया, पोलंड, दक्षिण कोरिया, टयूनिशिया.
गट 4 : कॅमरून, कॅनडा, एक्वाडोर, सौदी अरेबिया, घाना, पेरू/ऑस्ट्रेलिया/संयुक्त अरब अमिराती, कोस्टा रिका/न्यूझीलंड, वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन.