फिफा विश्‍वचषक: लुका मॉड्रिकला “गोल्डन बॉल’चा बहुमान, एमबापे “सर्वोत्तम युवा खेळाडू’

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा
मॉस्को: फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सकडून पराभूत झाल्यामुळे क्रोएशियाची इतिहास घडविण्याची संधी हुकली. परंतु क्रोएशियाचा कर्णधार व प्रेरणादायक खेळाडू लुका मॉड्रिकने अत्यंत प्रतिष्ठेचा “गोल्डन बॉल’ हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणारा पुरस्कार पटकावून त्या अपयशाची काही प्रमाणात भरपाई केली आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार फ्रान्सचा स्फोटक खेळाडू कायलियन एमबापे याने पटकावला आहे.

लुका मॉड्रिकने या स्पर्धेत क्रोएशियाच्या एकूण सात सामन्यांमध्ये तीन वेळा सामनावीर पुरस्कार पटकावून क्रोएशियाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. परंतु निर्णायक लढतीत फ्रान्सचा विजयरथ रोखण्यात आणि त्याच वेळी एमबापेसारख्या गुणवान युवा खेळाडूंचा उदय थांबविण्यात त्यांना अपयश आले. एमबापे केवळ 19 वर्षे वयाचा आहे. अंतिम फेरीत फ्रान्सचा चौथा गोल नोंदवून विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब करणाऱ्या एमबापेने उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार सहजच पटकावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणाऱ्या “गोल्डन बॉल’ पुरस्काराच्या यादीत बेल्जियमचा कर्णधार एडेन हॅझार्डने दुसरा क्रमांक राखला. तर अंतिम लढतीत स्पर्धेतील आपला चौथा गोल नोंदविणारा फ्रान्सचा अन्टोनी ग्रिझमनने तिसरा क्रमांक पटकावला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बेल्जियमच्या थिबॉट कोर्टोइसला “सर्वोत्तम गोलरक्षक’ हा पुरस्कार देण्यात आला. तस ग्रिझमन आणि एमबापे यांचे आव्हान मोडून काढताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने “गोल्डन बूट’ पुरस्कार जिंकला. केनने स्पर्देत सहा गोल नोंदविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)