फिफा विश्वचषक: विजयानंतर फ्रान्सचा जल्लोष! (फोटो फिचर)

बरोबर एक महिन्यापूर्वी सुरू झालेली फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा अखेर संपली. बलाढ्य संघांना बसलेले पराभवाचे धक्‍के व नवख्या संघांनी घेतलेली भरारी यामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली. फ्रान्सने पुन्हा एकदा 20  वर्षांनी फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

अंतिम फेरीत धडकलेल्या फ्रान्स आणि क्रोएशियाने अंतिम सामन्यात कोट्यवधी फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. रविवारी रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात चिवट आणि तितक्याच आक्रमक खेळामुळे, पहिल्यांदाच फायनल गाठणाऱ्या क्रोएशियाचा धडाकेबाज फ्रान्सने पराभव केला अन् फ्रान्सने २० वर्षांनी पुन्हा जगज्जेतेपद पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयानंतर फ्रान्सची राजधानी पॅरीस तसेच मास्को येथील मैदानावर फुटबॉलखेळाडूंनी एकच जल्लोष केला. या विश्‍वचषकात फ्रान्सने विश्‍वचषक जिंकला तर क्रोएशिया उपस्थितांची मने जिंकली.

फिफा विश्वचषक २०१८चे कॅमेऱ्यात कैद झालेले काही खास क्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)