FIDE World Blitz Championship 2024 :- भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत महिला पात्रता फेरीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याच स्पर्धेत भारताच्या कोनेरू हंपीने सुवर्णपदक पटकावले होते.
आर. वैशालीने 11 पैकी 9.5 गुण मिळवून महिला गटात विजय मिळवला. रशियाची कॅटेरिना लागानो 8.5 गुणांची कमाई केली होती. तर उर्वरित सहा क्वालिफायर्सचे आठ गुण झाले होते. टायब्रेकरमुळे हंपी नवव्या स्थानावर राहिली, त्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. खुल्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसनसह दहा खेळाडू पहिल्या स्थानासाठी बरोबरीत होते. कार्लसनने 13 पैकी सहा सामने ड्रॉ केले आणि पात्रता फेरीनंतर संयुक्त अव्वल स्थानावर राहिला.
रशियाच्या इयान नेपोम्नियाचीने 9.5 गुनांसह पात्रता फेरीतून आगेकूच केली. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना दुसऱ्या तर कार्लसन तिसऱ्या स्थानावर होता. भारताचा एकही खेळाडू अव्वल आठमध्ये पोहोचू शकला नाही.
भारताच्या अर्जुन एरिगेसीने पहिल्या पाच फेऱ्या जिंकल्या, मात्र त्यानंतर त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याचे केवळ सात गुण झाले. आर. प्रज्ञानंद 8.5 गुणांसह दुसरा आला. उपांत्यपूर्व फेरीत वैशालीचा सामना चीनच्या झु जिनरशी होईल. वैशालीने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर नाना जगनिडझे आणि रशियाच्या व्हॅलेंटिना गुनिना यांचा पराभव केला.