ल्यूसन – भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर बुध्दिबळपटू द्रोणावल्ली हरिका हिला फिडे महिला ग्रांपी बुध्दिबळ स्पर्धेच्या शेवटच्या फेरीतही बरोबरीवर समाधान मानावे लागले. युक्रेनच्या मारिया मुजिचुकने या फेरीत हरिकाला 25 चालींमध्ये बरोबरीत रोखले.
या बरोबरीमुळे हरिका शेवटच्या फेरीअखेर 5.5 गुणांसह गुणतक्त्यात सातव्या स्थानी कायम राहिली. तर, मारिया मुजिुचुक आणि बुल्गारियाची एंतोनेता स्टीफनोवा यांचेही 5.5 च गुण झाले आहेत.
या स्पर्धेत जार्जियाची नना दजागनिद्जे हिने रूसच्या अलेक्सांद्रा गोरयाचकिना हिचा पराभव करत स्पर्धेत अव्वलस्थान पटकावले आहे. दरम्यान,याआधीच्या दहाव्या फेरीत युक्रेनच्या अॅना मुझिचकने हरिकाला 31 चालींमध्ये बरोबरीत रोखले होते.