पुणे :- अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने खुल्या फिडे मानांकित एक दिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या जे के एक्सलन्स चेस अतादमीच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंहगड रोडवरील कोदरे फार्म्स येथे येत्या रविवारी ही स्पर्धा होईल. या स्पर्धेसाठी किंग्स इंडियन चेस क्लब, चेस लवर्स ग्रुप पुणे आणि नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली यांचे मोलाचे सहकार्य आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता एमसीएचे उपाध्यक्ष, सांगली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष आणि चितळे ग्रुपचे गिरीश चितळे आणि सांगली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष व कोटी भास्कर बिल्डर्स चे संस्थापक चिदंबर कोटीभास्कर, यांच्या हस्ते करण्यात येईल.
एकदिवसीय मानांकित स्पर्धा भरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय चेस फेडरेशन मान्यता प्राप्त कोच आणि आर्बिटर जुईली कुलकर्णी या पहिल्याच महिला संयोजिका आहेत. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे हे काम पाहणार आहेत.