चेन्नई – भारताची नवोदित ग्रॅण्डमास्टर आर. वैशाली हिने महिलांच्या फिडे ऑनलाइन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बल्गेरियाची तुल्यबळ खेळाडू व माजी जागतिक विजेती खेळाडू अंताओनेता स्टेफनोव्हाचा पराभव करत स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला.
अन्य लढतीत भारताची अव्वल खेळाडू कोनेरू हम्पीला पराभवाचा सामना करावा लागल्याने तिला पुढील फेरीत या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी सरस खेळ करावा लागणार आहे. वैशालीचा उपांत्यपूर्व फेरीत आता मंगोलियाच्या मुन्खजुल तुरमुंखशी गाठ पडेल. स्टेफनोव्हाचा वैशालीने 6-5 असा पराभव केला. या पराभवामुळे खुद्द स्टेफनोव्हाने तिचे अभिनंदन केले व तिच्या खेळाला दाद दिली.