देशाच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेबाबत फिक्कीला चिंता

नवी दिल्ली: देशाच्या खालावलेल्या अर्थिक स्थितीबाबत उद्योजकांची संघटना असलेल्या फिक्की संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गुंतवणूक आणि ग्राहकांची मागणी या दोन्ही बाजूंमध्ये सध्या मोठी घट दिसून येत आहे. जीडीपीचे आकडेही सहा वर्षाच्या नीचांकी पातळवर गेले आहेत ही स्थिती चांगले लक्षण नाही असे या संघटनेने म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर सरकारने काही उपाययोजना सुरू केली आहे त्याचे चांगले पडसाद पुढील तिमाहीत अशी आशाही या संघटनेने व्यक्त केली आहे. पीएचडीसीसीआय या संस्थेचे अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे की, सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही ठोस सुधारणा केल्या आहेत. त्यात बॅंकांना फेर भांडवल देणे, विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांवर लागू करण्यात आलेला सरचार्ज मागे घेणे, लघु आणि मध्यम उद्योगातील संस्थांचे जीएसटीतील देणे त्वरीत देणे हे निर्णय उत्साह वर्धक आहेत. तथापी सरकारने उद्योग व्यवसायापुढील अडचणी सोडवण्यासाठी आणखीही व्यापक उपाय केले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

एकेकाळी भारताची ओळख जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी होती पण आता मात्र जीडीपीचा दरखाली आला असल्याने भारताची ती ओळख पुसली गेली असून त्यातून भारताला सावरण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत असे बहुतांशी उद्योजकांचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)